आज मी खूप लो फील करत आहे 😔

Tap the picture to see it full size
आज मी खूप लो फील 😔करत आहे. दिवसभर घडलेल्या घटना आणि रात्री झोपेपर्यंतचा प्रवास खूप तणावपूर्वक आहे. मी एक हाउसवाइफ आहे घरातील मंडळी आणि माझी दोन मुलं यातच माझा पूर्ण दिवस जातो. 🌄 सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत🌃 सतत कोणाला - कोणासाठी काही ना काही करत असते,सगळ्यांचा ☕चहा पाणी जेवण🍱 अजून घरातील सर्व काम करते. घरातील सगळ्यांचं करता- करता, आज मी स्वतःला हरवून बसली आहे.
माझी ही काही स्वप्न होती, काही इच्छा होत्या...! पण आज मलाच आठवत नाही की... मला काय आवडायचं खरंच दुसऱ्यांच्या आवडीनिवडी जपता- जपता स्वतःपासूनच खूप खूपच दूर गेले आहे. मला खरंच कळत नाही, माझं नक्की अस्तित्व तरी काय आहे...? मी आज कोणाची तरी बायको आहे.. सून आहे.. आई आहे..,पण मी स्वतःची कोणीच नाही...! आज अचानक असं जाणवलं, की खरंच जर आपणच आपली किंमत केली नाही, तर या जगात आपल्याला काहीच किंमत नाही. खरंतर घरातल्या त्या एका बाईमुळे घराला घरपण असते. सगळ्यांचे सुखदुःख वाटली जातात,सगळ्यांच्या आवडीनिवडी जपल्या जातात, घरातील प्रत्येकाची इच्छा असते की, त्या एका व्यक्तीने सगळ्यांचे मन जपले पाहिजे...पण खरंच ते सगळेजण मिळून सुद्धा ते एका बाईचं मन जपू शकत नाही. सोडा.... हे सगळं कारण खूप काही आहे बोलायला पण शब्द कमी पडतील आणि मनातलं दुःख तीळभर ही कमी होणार नाही. आज मनात एक निश्चय केलाय काहीही झालं कोणी कितीही अडवलं, कोणाला आपली किंमत करायची आहे तर करू द्या, नाहीतर नाही..? पण रोज हळूहळू थोडं का होईना स्वतःसाठी जगायचं, कारण घरातल्या असो किंवा बाहेरचे आपण कितीही चांगलं वागलो तरी त्यांना त्याची किंमत नसते.
एक उदाहरण घ्या...सहजच सांगते, समजा आपण हॉटेलमध्ये गेलो आणि तिथे मेनू कार्ड बघितलं त्या मेनू कार्ड मध्ये व्हेज नॉनव्हेज असे पदार्थ दिसतात पण खिशाला परवडतील असेच पदार्थ सहसा लोक निवडतात, पण तोच पदार्थ जर आपल्या घरी बनला.., तर आपण त्या पदार्थाला किती नाव ठेवतो..? कारण पदार्थ सेम असतो, पण किंमत असते ती त्या हॉटेलमधल्या शेफ ची आणि घरातल्या त्या बाईची...! पदार्थ सेमच असतो पण बाहेर हॉटेलमध्ये जाऊन खाणार तर तोच पदार्थ किती छान चविष्ट👌🏻 लागतो भलेही त्यात मीठ कमी असो किंवा जास्त...पण घरात तोच पदार्थ कमी जास्त प्रमाणात झाला तर किती बोलतो आपण त्या बाईला असे खूप उदाहरणं आहेत खूप गोष्टी आहेत ज्या सांगत बसले तर शब्दही संपून जातील...
जाते आता मी भेटू कधीतरी अचानक अधून मधून... पण हो त्या सगळ्या स्त्रियांना एकच सांगते, की तुम्ही स्वतःची आवड जपा स्वतःच्या इच्छा जपा एखादी छोटीशी गोष्ट का होईना...! स्वतःसाठी करा, कारण आपण स्वतःला गमवलं तर कायमचं गमावून बसू....
When you've spent all day caring for others, do you
Your vote is final.
Written by
Neha IngleMore by Neha Ingle
Short link: hurroz.com/c/4DOYS