वर्गाबाहेरचा धडा म्हणजेच अनुभव

अनुभव हाच खरा शिक्षक

Neha Ingle2 hours ago1 min read
अनुभव हाच खरा शिक्षक

Tap the picture to see it full size

शाळेत आपण खूप काही शिकलो. अ, ब, क, ड, बेरीज-वजाबाकी, इतिहासातल्या सनावळ्या. शिक्षकांनी फळ्यावर लिहिलं आणि आपण वहीत उतरवून घेतलं. पण खरं सांगा, आज आपल्याला किती आठवतंय?

मला तर वाटतं, आयुष्याचे खरे धडे वर्गात कधीच शिकवले जात नाहीत. ते शिकतो आपण आपल्या अनुभवातून.

वर्गात आपल्याला सांगितलं जायचं - "नेहमी खरं बोला." पण बाहेर आल्यावर कळलं, कधी कधी खरं बोललं की माणसं दुखावतात, आणि खोटं बोलूनच नातं टिकवावं लागतं. वर्गात सांगितलं जायचं - "मेहनत केली की यश मिळतं." पण अनुभवाने शिकवलं, फक्त मेहनत नाही, तर वेळ, नशीब आणि योग्य माणसांची साथ पण लागते.

माणसाच्या आयुष्यात अनुभव फार महत्त्वाचे असतात. कारण अनुभवामुळेच आपल्याला माणसांची ओळख होते, नात्यांची ओळख होते, आपलेपणा आणि परकेपणाची जाणीव होते.

जसं म्हणतात ना - 'दूध का जला, छाछ भी फूंक फूंक कर पीता है' तसंच काहीसं आहे. एकदा आलेला वाईट अनुभव आपल्याला आयुष्यभर सावध करतो.

जर एखादी व्यक्ती उंच शिखरावर असेल, तर तिला तिथपर्यंत जाण्याचा मार्ग तिच्या वाईट अनुभवातूनच सापडलेला असतो.

एखादा वाईट अनुभव आला की दोन प्रकारची माणसं असतात. एक असतो जो खचून जातो, घाबरतो आणि पुन्हा प्रयत्नच करत नाही. आणि दुसरा असतो जो म्हणतो - "जाऊ दे, आज नाही जमलं, उद्या पुन्हा प्रयत्न करेन."

तो पुन्हा पडतो, पुन्हा अपयश येतं, पण तो हार मानत नाही. मनात एक जिद्द ठेवून तीच गोष्ट पुन्हा पुन्हा करतो. रोजच्या चुकांमधून तो एक-एक गोष्ट शिकत राहतो. आज एक चूक सुधारतो, उद्या दुसरी. आणि एक दिवस असा येतो की त्या अनुभवाचंच सोनं होतं.
म्हणूनच मला वाटतं, शाळेत आपल्याला खूप काही शिकवलं जातं, पण आयुष्याच्या पुस्तकात अनुभव हाच खरा शिक्षक असतो.

म्हणूनच मी ठरवलंय, आता पुस्तकं कमी आणि अनुभव जास्त गोळा करायचे. कारण शेवटी मार्क्स नाही, तर आपण काय शिकलो आणि किती घडलो हे महत्त्वाचं असतं. हा माझा अनुभव तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा.


तुम्हाला काय वाटतं याविषयी? मला नक्की सांगा.

When facing a setback, do you

1 vote

Your vote is final.

🤝 1
Comments1
Amy Anand46 minutes ago

माझे शिक्षण पूर्ण झाले आणि मी नोकरी करू लागले तेव्हा मला समजले की शाळा आणि कॉलेज मध्ये शिकलेल्या बऱ्याच गोष्टींचा काही उपयोग नाही. बहूतेक गोष्टी आयुष्यच शिकवते.

NI

Written by

Neha Ingle

More by Neha Ingle

Short link: hurroz.com/c/A02Y1