*आयुष्य - एक कैद*

पहिला श्वास ते शेवटचा श्वास

Neha Ingle1 hour ago1 min read
पहिला श्वास ते शेवटचा श्वास

Tap the picture to see it full size

मला असं वाटतं, आयुष्य 🥰खरंच खूप सुंदर आहे, पण तितकंच कठीण 🙃 सुद्धा आहे.

आपण छोट्या-मोठ्या गोष्टींमधून आनंद, दुःख, राग या सगळ्या भावना अनुभवत असतो. राग 😡आला की चिडतो, आनंद झाला की हसतो 😂 आणि छोटं-मोठं सेलिब्रेशन🎉 🎊 करतो.

आयुष्य असतं तरी कसं ना? माणसाच्या पहिल्या 👶🏻श्वासापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत 👴🏻अनेक घटना घडत असतात. जसजसं वय वाढतं, तसतसे टप्पे येत जातात. मूल पडतं, चालायला लागतं, हळूहळू कोणाचा तरी आधार बनतं.👫

मग एकाचा दोन होतो, दोनाचे तीन👨‍👩‍👦 होतात आणि नाती तयार होतात. एकाच व्यक्तीला अनेक नाती मिळतात, अनेक नावं मिळतात - कोणाची तरी मुलगी, कोणाची तरी आई. पण या सगळ्या गर्दीत ती व्यक्ती स्वतःची मात्र कधीच राहत नाही.

लहानपण खरंच खूप सुंदर ❤️असतं. तेव्हा काहीच कळत नाही. थोडं रडलो, चिडलो तरी आई-बाबा आपले हट्ट पुरवतात. पण मोठं झाल्यावर चित्र पूर्ण बदलतं. आपणच कोणाचे तरी आई-वडील होतो आणि मग आपल्यालाच सगळ्यांचे हट्ट पुरवावे लागतात.

कधी-कधी मला वाटतं, हे आयुष्य म्हणजे एक प्रकारचा तुरुंगच आहे. जिथे आपल्याला सतत दुसऱ्यांसाठी जगावं लागतं.

आपण सगळेच स्वतःसाठी जगतो का? नाही ना.

मला तर असं वाटतं, खरं तर स्वतःसाठी जगायचं असेल तर ते शेवटच्या श्वासानंतरच शक्य होईल. कारण त्यानंतर कोणाचीही आपल्याकडून कसलीच अपेक्षा उरत नाही.जोपर्यंत आपण आहोत, तोपर्यंत सगळ्यांना आपली गरज असते, आठवण असते. पण एकदा आपण गेलो की, ज्या अपेक्षा ते आपल्याकडून करत होते, त्या दुसऱ्या कोणाकडून तरी करायला लागतात.

म्हणूनच मी म्हणते, आयुष्य ही एक कैद आहे.

तुम्हाला काय वाटतं?

The author feels life is a prison, and true freedom only comes

No votes yet

Your vote is final.

Comments
NI

Written by

Neha Ingle

More by Neha Ingle

Short link: hurroz.com/c/P0BHY