समजूतदारपणाची किंमत

Tap the picture to see it full size
समजूतदारपणा म्हणजे - आयुष्य बेरंग?
मला असं वाटतं, आपण समजूतदार असलं पाहिजे. काही गोष्टी अशा असतात, ज्या समजून घेण्यातच आपलं भलं असतं, तर काही गोष्टी सोडून देण्यातच भलं असतं.
जेव्हा आपण समजूतदार असतो, तेव्हा आपण प्रत्येक गोष्टीचा विचार करतो. चांगलं-वाईट, त्याचे होणारे परिणाम... आणि मग कृती करतो. आणि त्याचेच परिणाम आपल्याला भविष्यात भेटतात.
खरं तर एक काळ असा असतो, जेव्हा आपल्याला चांगलं-वाईट काहीच कळत नाही. म्हणजेच बालपण. त्यावेळी आपण खूप हट्टी असतो. कोणी कितीही समजावलं तरी आपण ऐकत नाही, हट्ट धरून बसतो.
पण वेळेनुसार आपण बदलतो. मग प्रत्येकजण आपला स्वभाव निवडतो. कोणाचा रागीट, कोणाचा शांत, कोणाचा समजूतदार.
शांत स्वभाव असला तर छान असतं, आपण कोणाचं मन दुखवत नाही. जे बरं-वाईट असेल ते ऐकून घेतो. एक प्रकारचा समजूतदारपणाच असतो त्यात.
आणि एक असतो - चिडका, रागीट, भांडकुदळ... हाहाहा!
समजूतदार माणूस हा वेळ, काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, नातेवाईक, समाज सगळ्यांचा विचार करतो. त्याच्या मनाला पटलं नाही तरी तो तसंच आयुष्य जगत राहतो.
आणि दुसरा, तो रागीट माणूस... तो बिनधास्त जगतो. त्याच्या मनात येईल तसं वागतो, बोलतो, भांडतो, चिडतो. इन शॉर्ट, त्याला हवं तसं तो जगतो. त्याला भविष्याची काळजी नसते, भूतकाळाची चिंता नसते. तो फक्त स्वतःचा स्वार्थ बघतो. त्याच्यासाठी आयुष्य खूप सोपं असतं, कारण समोरचा माणूस नेहमी त्याला समजून घेतो.
पण जर विचार केला, तर जो समजूतदारपणाचा स्वभाव ठेवतो, त्याचं आयुष्य बेरंग होतं.
कारण त्याला सगळंच सारखं होतं. सुख-दुःख, इच्छा-आकांक्षा, स्वप्न... हे सगळं त्याच्या समजूतदारपणामुळे त्याच्यापासून कायमचं दूर जातं. आणि उरतं काय? तर फक्त आणि फक्त बेरंग आयुष्य.
तो दुसऱ्यांच्या इच्छा पूर्ण करतो, दुसऱ्यांसाठी जगतो. लोकही त्याला म्हणतात - "तू समजूतदार आहेस, तू समजून घे."
आणि तो समजून घेण्यातच पूर्ण आयुष्य घालवतो. एवढं सुंदर, रंगांनी भरलेलं आयुष्य तो त्या "समजूतदार" या टॅग पुढे सोडून देतो.
चेहऱ्यावर कायम एक खोटं हसू ठेवतो. आणि त्या हसू मागे त्याच्या कितीतरी इच्छा दडलेल्या असतात, पण त्या कोणालाच कळत नाहीत... कारण तो समजूतदार असतो.
तुम्हाला काय वाटतं? समजूतदार असणं चांगलं आहे की वाईट? नक्की सांगा.*
When people call you understanding, do you
Your vote is final.
Written by
Neha IngleMore by Neha Ingle
Short link: hurroz.com/c/K896S
आणखी एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवते की हट्टी लोकांना किती महत्व मिळते. असे करू नको तिला/त्याला आवडणार नाही असे आपण नेहमीच ऐकत आलोय. तसेच तू शहाणी आहेस adjust करून घे हे फार टोचतं. समजून घेण्याची जशी काही शिक्षाच मिळत असते आपल्याला. Shaking my head in disbelief
रंगीत फुलांमधले काळे फुल म्हणजे आपण जे नमतं घेतात. कुणाला त्रास होऊ नये किंवा वाद वाढू नये म्हणून आपण एक पाऊल मागे घेतो. पण ते दुसऱ्यांना वाटते की तेच बरोबर म्हणून आपण पाठी सरलो. अनेक वेळा आपल्याला ignore केलं जातं. कोणी कधी येऊन विचारत नाही. पण त्यांचा समज असतो की आपल्याला तर काही चालतं. मला हे खूप खटकतं.
आपण समजूतदार असणं बाकींच्यासाठी उत्तम पण आपल्यासाठी खूप वाईट. कारण इतरांना आपला फारसा विचार करावा लागत नाही. 'समजूतदार' ची पदवी देऊन इतर आपल्याला जास्त महत्व देत नाहीत. पण एकदा अडून बसणारा असेल तर त्या व्यक्तीला खुश करण्यासाठी खूप प्रयत्न केले जातात असे मी पाहिलं आहे.