आणखी एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवते की हट्टी लोकांना किती महत्व मिळते. असे करू नको तिला/त्याला आवडणार नाही असे आपण नेहमीच ऐकत आलोय. तसेच तू शहाणी आहेस adjust करून घे हे फार टोचतं. समजून घेण्याची जशी काही शिक्षाच मिळत असते आपल्याला. Shaking my head in disbelief
Amruta Kanekar6 days ago▲ 4
रंगीत फुलांमधले काळे फुल म्हणजे आपण जे नमतं घेतात. कुणाला त्रास होऊ नये किंवा वाद वाढू नये म्हणून आपण एक पाऊल मागे घेतो. पण ते दुसऱ्यांना वाटते की तेच बरोबर म्हणून आपण पाठी सरलो. अनेक वेळा आपल्याला ignore केलं जातं. कोणी कधी येऊन विचारत नाही. पण त्यांचा समज असतो की आपल्याला तर काही चालतं. मला हे खूप खटकतं.
Writer replied
खरं आहे Amruta... नमती घेणं म्हणजे हार मानणं नसतं,पण समोरच्याला तेच बरोबर वाटतं. तुझं हे दुखणं मला कळतंय. आपण सगळे समजूतदार काळी फुलंच आहोत. 🥀
Amy Anand6 days ago▲ 6
आपण समजूतदार असणं बाकींच्यासाठी उत्तम पण आपल्यासाठी खूप वाईट. कारण इतरांना आपला फारसा विचार करावा लागत नाही. 'समजूतदार' ची पदवी देऊन इतर आपल्याला जास्त महत्व देत नाहीत. पण एकदा अडून बसणारा असेल तर त्या व्यक्तीला खुश करण्यासाठी खूप प्रयत्न केले जातात असे मी पाहिलं आहे.
Spotlight
Comments
on "समजूतदारपणाची किंमत"
Back to the chapterआणखी एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवते की हट्टी लोकांना किती महत्व मिळते. असे करू नको तिला/त्याला आवडणार नाही असे आपण नेहमीच ऐकत आलोय. तसेच तू शहाणी आहेस adjust करून घे हे फार टोचतं. समजून घेण्याची जशी काही शिक्षाच मिळत असते आपल्याला. Shaking my head in disbelief
रंगीत फुलांमधले काळे फुल म्हणजे आपण जे नमतं घेतात. कुणाला त्रास होऊ नये किंवा वाद वाढू नये म्हणून आपण एक पाऊल मागे घेतो. पण ते दुसऱ्यांना वाटते की तेच बरोबर म्हणून आपण पाठी सरलो. अनेक वेळा आपल्याला ignore केलं जातं. कोणी कधी येऊन विचारत नाही. पण त्यांचा समज असतो की आपल्याला तर काही चालतं. मला हे खूप खटकतं.
आपण समजूतदार असणं बाकींच्यासाठी उत्तम पण आपल्यासाठी खूप वाईट. कारण इतरांना आपला फारसा विचार करावा लागत नाही. 'समजूतदार' ची पदवी देऊन इतर आपल्याला जास्त महत्व देत नाहीत. पण एकदा अडून बसणारा असेल तर त्या व्यक्तीला खुश करण्यासाठी खूप प्रयत्न केले जातात असे मी पाहिलं आहे.
Showing 3 of 4 comments.